‘अंताजीची बखर’ : एक ऐतिहासिक कादंबरी वेगळ्या दृष्टीकोनातून
अंताजी सामान्य ब्राह्मण संस्कारांपासूनही मुक्त होता, हे एक आणि त्याला शौर्य आणि वीरश्रीचे मुळातच वावडे होते, हे दुसरे. थोड्याशा खट्याळ आणि किंचित् खवचट दृष्टीकोनातून स्वकियांची आणि ज्यांची चरित्रे पाहा जरा म्हणतात, त्या पूर्वश्रींची थोडी निरामय थट्टा हे या लेखकाचे वैशिष्ट्य जसे अभूतपूर्व, तसे दुसरे एक वैशिष्ट्यही आतापर्यंतची मराठी ऐतिहासिक कादंबरी पाहता अद्वितीयच म्हटले पाहिजे.......